ट्रेनमध्ये जुळ्यांचा जन्म; डिलीव्हरीसाठी कल्यामध्ये आर्धा तास थांबली ट्रेन

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 15 जुलै 2018

कल्याणमध्ये एका महिलेनं गोंडस जुळ्या मुलांना चक्क ट्रेनमध्ये जन्म दिला. कल्याण इथं विशाखापट्टनममधून आलेल्या ट्रेनमध्ये महिलेनं जुळ्या मुलांना जन्म दिलाय. सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी या महिलेची ट्रेनमध्ये डिलीव्हरी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांची टीमही ट्रेनमध्ये हजर होती.

दरम्यान या महिलेच्या डीलिव्हरीसाठी ट्रेन अर्धा तास कल्याण स्थानकात थांबवण्यात आली होती. शेख सलमा तब्बसून असं महिलेचं नाव असून आता जुळी बाळं आणि बाळंतीण तिघेही सुखरुप आहेत. आपल्या कुटुंबासोबत प्रवासी करणारी ही महिला घाटकोपरमधील राहणारी आहे. ती प्रवास करत असताना तिला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या.

दरम्यान रुग्णालयात दाखल करणं तात्काळ शक्य नसल्यानं, या महिलेची ट्रेनमध्ये डिलीव्हरी करण्यात आली. आता पुढील उपचारासाठी जुळ्या मुलांसह आईला रुक्मिणीबाई हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live