मंत्रालयातील हत्या रोखण्यासाठी बारा फूट उंचीची भिंत आणि लोखंडी ग्रिल  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

मंत्रालयात उडी मारून आत्महत्या करू नये, यासाठी सुरक्षा जाळी बसविण्यात आल्यानंतर आता बाह्यसुरक्षेसाठी बारा फूट उंचीची भिंत व लोखंडी ग्रिलच्या कंपाउंडचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्याचे सुरक्षा कंपाउंड परिणामकारक नसल्याने मंत्रालयाच्या चोहोबाजूने नवीन कंपाउंड उभारण्याची सुरुवात पुढील आठवड्यात होणार आहे. 

गृहविभागाने मंत्रालय सुरक्षेच्या संदर्भात अहवाल दिला होता. त्यात मंत्रालय सुरक्षेच्या बाबतीतल्या त्रुटी स्पष्ट केल्या होत्या. मंत्रालयाच्या चोहोबाजूला अनेक त्रुटी असल्याने नव्या मजबूत व कडेकोट सुरक्षा कंपाउंडची गरज गृहविभागाने व्यक्‍त केली होती. त्यानुसार चारही बाजूला ही व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे.  

यात चार फूट उंचीची काँक्रिटची भिंत राहणार आहे. त्यावर आठ फूट उंचीचे उच्च दर्जाचे व मजबूत लोखंडी ग्रिलचे टोकदार कंपाउंड बसवले जाणार आहे. यासाठी सध्या तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  

संबंधित बातम्या

Saam TV Live