गुरुवारी टाळा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील प्रवास..  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

पनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक गुरुवारी (ता. 6) दुपारी 12 पासून 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

या मार्गावर खालापूर टोल नाक्‍याच्या अगोदर ओव्हर हेड गॅण्ट्री बसवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) करण्यात येणार आहे. हे काम सुरू असताना पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना शेडुंग फाटामार्गे जुन्या मुंबई-पुणे मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करता येणार आहे.

दरम्यान, या कालावधीत महामार्गावरून होणारी अवजड वाहतूकही बंद ठेवली जाणार आहे.

Web Title: Two hours block on Mumbai Puneexpress way

संबंधित बातम्या

Saam TV Live