पुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (शनिवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील तिकून गावामध्ये आज पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून कारवाई करण्यात आली. मात्र, दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर चकमक झाली. या चकमकीत एकही जवान जखमी झालेला नाही.

या परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत असून, अद्याप काही दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. शोपियाँत गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते.

WebTitle : marathi news two terrorist shot dead in pulwama jammu and kashmir 

संबंधित बातम्या

Saam TV Live