आता बिनधास्त जा उडत; नो ट्रॅफिक, नो झंझट.. 

आता बिनधास्त जा उडत; नो ट्रॅफिक, नो झंझट.. 

अलिकडे कुठचाही प्रवास करायचा म्हंटला की नको होतं. लोकल, बस, टॅक्सी सगळीकडे नुसती गर्दीच गर्दी. त्यातही ट्रॅफिकमुळे नियोजित स्थळी वेळेत पोहचू की नाही याची कायम धाकधूक. पण टेन्शन घेऊ नका आता फार काळ वाट पाहायची गरज नाही. अमेरिकेतल्या उबेर कंपनीनं यावर एक भन्नाट आयडिया शोधून काढलीय. प्रवास अधिक सुखकर आणि लवकर व्हावा यासाठी उबेर उडणारी टॅक्सी आणणार आहे. कंपीनीनं नुकताच या टॅक्सीची झलकसुद्धा दाखवली. उबेरची एअर टॅक्सी सेवा 2023 पासून सुरु होईल. त्याच्या चाचण्या पुढील वर्षापासून सुरु केल्या जातील. उबेरनं सगळ्याच आधी या टॅक्सीचं प्रोटोटाईप डिझाईन शेअर केलं होतं. मात्र आता प्रत्यक्ष टॅक्सी सादर केलीय.

वॉशिंग्टन डीसी मध्ये झालेल्या वार्षिक उबेर एलिव्हेट फ्लाईंग टॅक्सी परिषदेत ही उडणारी टॅक्सी सादर केली गेली. ही टॅक्सी आतून बरीचशी हेलिकॉप्टर प्रमाणे आहे. या टॅक्सीची अंतर्गत सजावट फ्रांन्सची एअरोस्पेस कंपनी साफ्राननं केलीय. या टॅक्सीमधून एकावेळी चार प्रवासी प्रवास करू शकतील. हा प्रवास खूपच कमी वेळात होणार आहे. एक राईड 20 मिनिटांची असेल. त्यात पिकअप ड्रॉप टाईमही समाविष्ट आहे. या प्रवासासाठी किती भाडे आकारले जाणार हे अजून स्पष्ट केलं गेलेलं नाही. मात्र याच अंतराच्या हेलिकॉप्टर राईडपेक्षा ते कमी असेल असं सांगण्यात येतंय.

कशी आहे या टॅक्सीच्या आतील व्यवस्था 

या टॅक्सीमध्ये चार प्रवासी आणि पुरेसे सामान ठेवण्याची जागा आहे. ही टॅक्सी उडत असताना खास लाईट सुरु असेल आणि तो निळ्या रंगाचा असेल. तर प्रवासी उतरत असताना पांढरया रंगाचा लाईट लागेल. उबेरच्या उडत्या टॅक्सची  सेवा सगळ्यात आधी टेक्सासच्या डलास आणि लॉस एंजेलिस इथं सुरु होईल.

आता तुम्ही म्हणाल भारतातल्या लोकांना या टॅक्सीचा उपयोग काय. काळजी करण्याचं कारण नाही. भारतात सुद्धा या उडत्या टॅक्सीची सेवा सुरू करण्यासाठी कंपनीमार्फत प्रयत्न सुरू आहेत. भारतात सध्या उबेरची टॅक्सी सेवा सुरू आहेत याच धर्तीवर उडणाऱ्या सेवेलाही परवानगी द्यावी यासाठी प्रयत्न सरू आहेत. यासंदर्भात काय नियम असतील, ही सेवा कुठल्या कुठल्या शहरात सुरू करता येईल या अनुषंघाने केंद्र सरकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयासोबत चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळे भारतात जर ही उडती टॅक्सी आली तर प्रवासावरचा बराचसा भार हलका होईल..

WebTitle : marathi news uber soon to start flying taxi service 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com