तानाजी चित्रपटाचे उदयनराजेंनी केले कौतुक म्हणाले...

तानाजी चित्रपटाचे उदयनराजेंनी केले कौतुक म्हणाले...

मुंबई : 'तानाजी - द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचे कौतुक सर्वत्र सुरु असताना आता माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही या चित्रपटाच्या टीमचे कौतुक करत यापुढेही आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

"तानाजी द अनसंग वॉरीयर" या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी एवढी कमीच आहे त्यांना पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तसेच यापुढे ही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा.@ajaydevgn @itsKajolD @SharadK7 pic.twitter.com/Hvsvf7UP6t

— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 11, 2020

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही पहिल्याच दिवशी 16 कोटींची कमाई केली आहे. अजय देवगनचा हा 100 वा सिनेमा आहे. तसेच अजय देवगन आणि काजोल तब्बल 10 वर्षांनंतर एकत्र काम करत आहे. अजय देवगनच्या तोडीला तोड असा अभिनेता सैफ अली खानची भूमिका देखील वाखाण्याजोगी आहे. या चित्रपटाच्या सुरवातीलाच उदयनराजे यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

उदयनराजेंनी ट्विट करत म्हटले आहे, की "तानाजी द अनसंग वॉरीयर" या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी एवढी कमीच आहे. त्यांना पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. तसेच यापुढेही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा.' या ट्विटसह त्यांनी अजय देवगन, काजोल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकरला टॅग केले आहे.

Web Title: chatrapati Udyanraje Bhosale appriciate Tanhaji Movie and Ajay Devgan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com