उदयनराजेचं नेमकं काय चुकलं? महापुरूषांच्या नावावर वाद कशासाठी? वाचा सविस्तर

साम टीव्ही
गुरुवार, 23 जुलै 2020
  • उदयनराजेचं नेमकं काय चुकलं ? 
  • जय भवानी, जय शिवाजी घोषणेवरून राजकीय वाद
  • महापुरूषांच्या नावावर वाद कशासाठी ?

उदयनराजेंच्या शपथविधीवेळी राज्यसभेत उडालेल्या गोंधळाचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. उदयनराजे तसंच सभापती व्यकंय्या नायडूंनी त्यावरून स्पष्टीकरणही दिलंय. मात्र उदयनराजेंचं नेमकं काय चुकलं? हा प्रश्न आता विचारला जातोय. 

खासदारांच्या शपथविधीवेळचं हे चित्र. उदयनराजेंनी शपथविधीवेळी जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा करताच. गोंधळ उडाला आणि त्याचे राजकीय पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच उदयनराजेंनी या संपूर्ण वादावर आळमिळीची भूमिका घेत सावध प्रतिक्रिया दिलीय. एका खासदाराने घोषणेवर आक्षेप घेतल्यानं हा गोंधळ झाल्याचं त्यांनी म्हंटलंय. 
या संपूर्ण प्रकरणात भाजपने माफी मागावी...जोपर्यंत भाजप माफी मागत नाही तोवर उदयनराजेंनी कामकाजात सहभागी होऊ नये असं आवाहन ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी केलंय. 

दरम्यान शपथविधीवेळी कोणत्याही घोषणा देता येत नाहीत. कुणाचाही अनादर करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. असं स्पष्टीकरण व्यंकय्या नायडू यांनी दिलंय. अर्थात असं असलं तरी महापुरूषांच्या नावावरून वाद कशासाठी असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live