जाणते राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच : उदयनराजे

सरकारनामा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

पुणे :  जाणते राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच, असे सांगत छत्रपती उदयनराजे यांनी भाजपच्या नेत्याने लिहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व छत्रपतींची तुलना करणाऱ्या पुस्तकाबाबत आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. जाणते राजे ही उपमा इतरांना देतात त्याचाही आपण निषेध करतो, असाही टोला उदयनराजेंनी कुणाचे नाव न घेतला लगावला. शिवसेनेच्या भूमिकेवरही उदयनराजेंनी कडक शब्दात टिका केली. शिवसेना नाव काढून टाका ठाकरे सेना म्हणा. कोण येतय तुमच्याकडे पाहू? असा टोला त्यांनी लगावला

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या भाजपच्या एका नेत्याने प्रकाशित केलेल्या वादग्रस्त पुस्तकावर छत्रपती उदयनराजे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे पुस्तक लिहिले गेल्याने मला वाईट वाटले. अनुकरण करणे मान्य आहे. पण तुलना योग्य नाही, असाही टोला त्यांनी लगावला. 

या पुस्तकावर छत्रपतींच्या वंशजांनी भूमिका घ्यावी, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्यावरही उदयनराजेंनी टिका केली. ते म्हणाले, ''दांडपट्टा हातात नसताना फिरवणारे आहेत. त्यांचे नाव घेऊन त्यांना मोठे करणार नाही. आता लोकशाही आहे. मात्र त्याने आपली लायकी ओळखून घ्यावी," शिवसेना काढताना आम्हाला विचारले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिववडा काढता? महा विकास आघाडीतुन शिव का काढले? शिवसेना भवनावर वरती बाळासाहेबांची प्रतिमा खाली महाराजांची असे का? असेही थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जेम्स लेन च्या वेली सेना कुठे होती? असा प्रश्न करत आता एकेकाकडे बघून घेईन असेही उदयनराजे म्हणाले. आता तुमची वेळ संपली. आम्ही बांगडी भरलेली नाही, असाही इशारा उदयनराजेंनी दिला.

हे सारे काही सत्तेसाठी सुरु आहे. तीन-तीन वेळी शिव जयंती साजरी करतात. अजून किती अपमान करणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शिवस्मारकाचे काय झाले, अशीही विचारणा त्यांनी केली. लोकशाहीच्या नावावर सर्व राजकारणी श्रीमंत झाले आणि केवळ याचसाठी ते महाराजांचे नाव घेतात, असेही उदयनाराजे म्हणाले. याद राखा आमचे नाव घेतले तर परिणाम काय होतील मी सांगू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

Web Title udayanraje criticism book narendra modi

संबंधित बातम्या

Saam TV Live