पवारांसमोरच उदय़नराजे आणि रामराजे भिडले..

तुषार रुपनवर
शनिवार, 15 जून 2019

खासदार उदयनराजे आणि रामराजे नाईक संघर्षाचे तीव्र पडसाद राष्ट्रवादीच्या बैठकीत उमटले. दस्तुरखुद्द शरद पवारांसमोरच दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली.. हा वाद इतका वाढला की  भडकलेले उदयनराजे बैठक सोडून तावातावाने बाहेर पडले. उदयनराजेंच्या हावाभावावरुन राष्ट्रवादीच्या बैठकीत काय झालं असेल याचा अंदाज लावता येईल.

उदयनराजेंनी असा संताप व्यक्त केलेला असताना, रामराजेंनी मात्र यावर बोलणं टाळलं. तिकडे साताऱ्यात रामराजे नाईक निंबाळकरांनी केलेल्या टीकेवरुन राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक झाले..त्यांनी रामराजेंच्या पुतळ्याचे दहन केलं 

रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजेंमधील संघर्ष नवा नाही....नीरा देवघर पाणी प्रश्नावरुन तो आणखी पेटलाय... या संघर्षाची ठिणगी पडली ती उदयनराजेंनी नीरा देवघर पाणी प्रश्नावरुन रामराजेंवर केलेल्या टीकेवरुन....मग उदयनराजेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रामराजेंचीही जीभ घसरली

साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजांमध्ये सुरु झालेला संघर्ष पवारांच्या कोर्टाच पोहचला. दोन राजांमधल्या वादात शरद पवारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला..मात्र पवारांची मध्यस्थी निष्फळ ठरल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर साताऱ्यात  सुरु झालेला हा वाद राष्ट्रवादी नेतृत्वाची नक्कीच डोकेदुखी वाढवणारा आहे.

web title:  Udayanrajje and Ramaraj came in front of Pawar.

संबंधित बातम्या

Saam TV Live