उदनयराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

उदनयराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार  उदनयराजे भोसले यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळ, मराठा-धनगर-मुस्लिम आरक्षण, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पुनर्मुद्रण याविषयी चर्चा केली.  

''विदेशात ज्या प्रमाणे दुष्काळावर मात करणारी ‘इरमा’ सारख्या योजना आहेत. तशीच योजना राज्यातही सुरू करावी तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणामधील अडथळे लवकरात लवकर दूर करून या समाजाचे प्रश्न सोडवावेत,'' असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे उदयनराजे म्हणाले. 

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण सध्या न्यायालयात असून त्याबाबत सरकार खूपच गंभीर आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. त्यामुळे न्यायालयात सरकारची बाजू मांडण्यासाठी सरकारने वरिष्ठ कायदे तज्ञांची नेमणूक केली आहे. यामध्ये सरकारची बाजू भक्कम असून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात कसलाही अडथळा येणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती उदयनराजे यांनी दिली. यावेळी त्यांनी मुस्लीम आणि धनगर समाजचे प्रश्न मार्गी लावण्याचेही आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याआधी उदयनराजे यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन मराठा आरक्षण, दुष्काळ याविषयावर चर्चा केली. यावेळी पवार अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिरने प्रकाशित केलेले शेजवलकर लिखित शिवचरित्राचे पुनर्मुद्रण करावे या मागणीचे निवेदन  दिले. यावेळी श्रीमंत कोकाटे,चंद्रकांत पाटील आणि रवी शिंदे उपस्थित होते.

web tittle-Udayayaraje Bhosale took the meeting of Chief Minister

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com