उद्धव ठाकरे आज शिवनेरीवरुन करणार मोठी घोषणा

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरीवर जाणार आहेत. शिवनेरीवर जाऊन मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यताय.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या काही दिवसांपासून सरकारनं सातत्यानं बैठका घेतल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे कर्जमाफीची घोषणा करतात का, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, शिवनेरीवर जाण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्ल्याला जाणार आहे. कार्ल्याला जाऊन ते एकवीरा देवीचं दर्शन घेणार आहे. तिथून ते शिवनेरीसाठी रवाना होतील. 

दरम्यान आज गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यानिमित्तानं पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची शक्यता आहे. गोपीनाथ गडावर सकाळपासूनच मुंडे समर्थक गर्दी करतायेत. यावेळी 'पंकजा मुंडे जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं मुंडे समर्थकांनी स्पष्ट केलंय. तिथेही उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. 

जयंत पाटील उपमुख्यमंत्री तर अजित पवारांना अर्थ खातं?

Web Title - Uddhav Thackeray to announce big announcement from Shivneri today

संबंधित बातम्या

Saam TV Live