...ते मोठे बंधू आहेत त्यामुळे 'त्यावर' बोलणार नाही; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोमणा

सरकारनामा
मंगळवार, 3 मार्च 2020

मुंबई : नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियापासून संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. त्याबाबत आपणाला काही बोलायचे नाही, ती मोठे बंधू आहेत, अशी मिस्किल टिप्पणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियापासून संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. त्याबाबत आपणाला काही बोलायचे नाही, ती मोठे बंधू आहेत, अशी मिस्किल टिप्पणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

कर्जमाफीबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, "डिसेंबर च्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केली होती. १५ हजार लोकांची पहिली यादी जाहीर केली होती. 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. सर्व ठिकाणी काम व्यवस्थित सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. पाच लाखांपर्यंतची यादी आमच्याकडे तयार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर व्हायला सुरुवात झाली आहे. आचारसंहिता आहे त्यामुळे काही ठिकाणची यादी बाकी आहे." दोन महिन्यांत शेतकऱ्यांनी संयम सोडला नाही. त्यांना पूर्वी प्रमाणे त्यांना हेलपाटे मारावे लागले नाहीत. त्यांना रांगेत उभे रहावे लागले नाही. आता ही योजना पूर्ण करून पुढील योजना आणणार आहोत, असेही ते म्हणाले. 

मुस्लिम आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, "मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अजून आलेला नाही. ज्यावेळी मुद्दा येईल त्यावेळी बोलेन. जे आदळआपट करत आहे त्यांनी ताकत वाया घालवू नये असे मी नम्रपणे सांगतो.'' ७ तारखेला आम्ही अयोध्याला जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. देव सर्वांचा आहे, देवदर्शनात कसले राजकारण असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

Web Title uddhav thackeray avoided comment narendra modi social media decission


संबंधित बातम्या

Saam TV Live