उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्याबाबत काय म्हणतायत रामदास आठवले..  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

पुणे : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकदाच काय दहावेळा जरी अयोध्या दौरा केला तरी राम मंदिर होणार नाही. हा दौरा शिवसेना खासदारांच्या दर्शनासाठी आहे अशी खरमरीत टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली. 

माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, "माझे वैयक्ति मत असे आहे की अयोध्येतील राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार तेथे राम मंदिर आणि मशिद होईल. न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा ही करावी लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरे कितीही सांगत असले तरी तेथे राम मंदिर होणे शक्‍य नाही. अयोध्येच्या मुद्यावर त्यांनी कायदा हातात घेऊ नये. शिवसेनेचे लोकसभेवर जे खासदार निवडून आले आहेत त्यांना अयोध्येतील रामाचे दर्शन घडविण्यासाठी दौरा आहे. उद्धव यांनी लोकांच्या भावनांचा आदर करायला हवा.'' 

Web Title : marathi news uddhav thackeray ayodhya visit ramdas athavales comment on it

संबंधित बातम्या

Saam TV Live