आश्वासनं देऊन लोकांची फसवणूक करणं हा देशद्रोह.. उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

शिर्डी - ‘‘येथील जनतेला ‘कसं काय, बरं आहे ना,’ असे मराठीतून विचारणाऱ्या पंतप्रधानांना ‘अजिबात बरं नाही,’ असे सांगण्याचे धाडस फक्त महाराष्ट्रातील जनताच करू शकते. राममंदिर उभारणी, ३७० वे कलम हटविणे आणि समान नागरी कायदा ही आश्‍वासने ‘चुनावी जुमला’ होती, हे भाजपने जाहीर करावे. खोटी आश्‍वासने देऊन सत्ता मिळविणे हा देशद्रोह आहे,’’ अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. 

ठाकरे म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी खोटी जाहिरातबाजी करून जनतेची दिशाभूल करतात. त्यांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, उज्ज्वला गॅस, घरकुले याबाबत फसवे दावे केले जातात. 

जनतेकडून खोटे वदवून घेणारी जाहिरातबाजी करणाऱ्यांचे बुरखे फाडून वास्तव लोकांसमोर आणण्याचे काम शिवसेनेच्या गटनेत्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी करावे. मराठा व धनगर आरक्षणाला आपला पाठिंबा आहे.’’

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. 

WebTitle : marathi news uddhav thackeray on bjp and their assurance to people of India 

संबंधित बातम्या

Saam TV Live