'बारामतीच्या पाण्यावर' उद्धव ठाकरेंनी भुमिका बदलली!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 जून 2019

सातारा : निरा-देवधरच्या पाणी प्रश्‍नाबाबत शिवसेना अन्यायाच्या विरोधात आपल्यासोबत आणि सोलापूर, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी जनतेच्यासोबत असेल, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिली.

निरा देवधरच्या पाण्यावर सध्या राष्ट्रवादी विरूध्द भाजप असा संघर्ष सुरू झाला आहे. निरा देवधरचे पाणी बारामतीला देऊन सातारा व सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केल्याने ते पाणी बंद करण्याची भुमिका माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. 

यावेळी निरा-देवधरच्या पाण्यावर सुमारे अर्धातास चर्चा झाली. या पाण्यावरून सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळी जनतेवर बारामतीकरांनी कसा अन्याय केला हे खासदार रणजितसिंह यांनी निदर्शनास आणून दिले. यावर उध्दव ठाकरे यांनी शिवसेना अन्यायाच्या विरोधात आपल्यासोबत आहे. तसेच पाणी प्रश्‍नाबाबतही सोलापूर व सातारा जिल्ह्यातील दुष्काळी जनतेच्या सोबत आम्ही आहोत, असा शब्द त्यांनी दिला. तसेच लवकरच आम्ही दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याची माहिती श्री. ठाकरे यांनी दिल्याचे निंबाळकर म्हणाले.

web tittle- Uddhav Thackeray changed the role on Baramati's water!

संबंधित बातम्या

Saam TV Live