उद्धव ठाकरेंचा पुन्हा 'चलो अयोध्या' चा नारा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जून 2019

मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या अगोदर अयोध्येला जाऊन ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा देणाऱ्या शिवसेनेने आता केंद्र सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुन्हा अयोध्या वारी करण्याची घोषणा केली आहे.

राज्यात शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाल्यानंतर प्रचंड आनंदात असणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांसह देवदर्शन सुरू केले आहे. १५ जूनला ते सर्व नवनिर्वाचित खासदारांच्या सोबत अयोध्येला प्रभू रामचंद्रांच्या चरणी आशीर्वाद घ्यायला जाणार आहेत.

या अगोदरचा ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजला होता. मंदिर उभारणीत शिवसेना आक्रमक असल्याचे चित्र देशभरात निर्माण झाले होते. संत-महंतांच्या सोबत त्यांनी चर्चा केली होती. शरयु नदीच्या किनारी भव्य-दिव्य आरतीचे आयोजनदेखील करण्यात आले होते. ‘पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा देत ठाकरे यांनी भाजपची कोंडी केली होती. शिवसेना लोकसभा निवडणुकीत युती करणार की नाही, या चर्चेने राजकारण ढवळून निघाले होते. मात्र, त्यांनी युती करीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आणले.

आता पुन्हा अयोध्येला जाऊन राम मंदिर उभारणीसाठी शिवसेना आक्रमक होण्याचे सूतोवाच मिळत आहेत. या वेळी ठाकरे हे १८ खासदारांसह राम मंदिर उभारणीचा शंखनाद करतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

लोकसभा विजयानंतर सर्व खासदारांसह ठाकरे यांनी कार्ला येथील कुलस्वामिनीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरलाही अंबाबाईच्या दर्शनासाठी सर्व खासदारांसोबत गेले होते.

दुष्काळी परिस्थितीचा उद्धव ठाकरेंकडून आढावा
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. ४) मुंबईतील बैठकीत घेतला. त्यासाठी त्यांनी दादर येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात तातडीची बैठक बोलावली होती.

राज्यात दुष्काळामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारने काही पावले उचलली असली, तरी अनेक जिल्ह्यांमध्ये मदत पोचलेली नाही. खालावलेली पाण्याची पातळी, सरकारने सुरू केलेले पाण्याचे टॅंकर आणि चारा छावण्या यांची माहिती उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. सर्व ठिकाणी तातडीने मदत पोहोचवण्याचा आदेश त्यांनी प्रशासनाला दिला.

या बैठकीला रामदास कदम, दीपक केसरकर, दिवाकर रावते, सुभाष देसाई, दादा भुसे, विजय शिवतारे, संजय राठोड, दीपक सावंत आदी उपस्थित होते

संबंधित बातम्या

Saam TV Live