उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचं निमंत्रण नाही, मुख्यमंत्री योगींशिवाय कोणालाही निमंत्रण नाही...

साम टीव्ही
शुक्रवार, 31 जुलै 2020
  • उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचं निमंत्रण नाही
  • फक्त यूपीच्या मुख्यमंत्र्यांना दिलं निमंत्रण
  • इतर कोणत्याही मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही
  • भूमिपूजनासाठी फक्त सीएम योगींना निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला राममंदिराचं भूमिपूजन होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे.  सध्या तयार केलेल्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वगळता देशातील एकाही मुख्यमंत्र्यांला निमंत्रण नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याने शिवसैनिकांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

निवडक मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिल्यास वाद उद्भवू शकतो. आणि सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सर्व मुख्यमंत्र्यांना बोलवणे शक्य नाही. म्हणून केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात आल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे ऱाममंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्यावर कोरोनाचं सावट पडलंय. कारण मुख्य पुजारी प्रदीप दास यांना कोरोनाची लागण झालीय. इतकंच नाही तर राम जन्मभूमीवर तैनात असणारे 16 पोलिसही कोरोनाबाधित झालेत.

येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणारेय. त्याची जय्यत तयारीही सुरू झालीय. देशभरात भूमिपूजनाच्या निमित्ताने आनंदाचं वातावरण असतानाच, या भूमिपूजनाच्या सोहळ्यावर कोरोनाचं सावट पडलंय. कारण मुख्य पुजारी प्रदीप दास यांना कोरोनाची लागण झालीय. इतकंच नाही तर राम जन्मभूमीवर तैनात असणारे 16 पोलिसही कोरोनाबाधित झालेत. कदाचित यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जातेय.


संबंधित बातम्या

Saam TV Live