ठाकरे सरकार | उद्धव ठाकरेंनी स्वीकारला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार...

Uddhav Thackeray , Eknath Shinde , Nilam gorhe
Uddhav Thackeray , Eknath Shinde , Nilam gorhe

काल उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात दाखल झालेत आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला आहे.

मातोश्रीवरून निघाल्यावर उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. मंत्रालयात पोहोचल्यावर उद्धव ठाकरे यांनी इथे उपस्थित सर्वांना अभिवादन केलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजमाता जिजामाता यांच्या तसबिरीला देखील अभिवादन केलं.  मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याच्या याच दालनातून उद्धव ठाकरे हे पुढील पाच वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेचा गाडा हाकणार आहेत. 

पदभार स्वीकारताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते हजर होते. याचसोबत उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. शिवसैनिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर मंत्रालयात गर्दी केली आहे.  

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यातून विविध लोकं भेटीसाठी आलेत. मंत्रालयात दुपारचा वेळ हा खरंतर लंच टाइम असतो. मात्र सर्व कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटता येईल, त्याची एक झलक आपल्या मोबाईलमध्ये  टिपता येईल यासाठी मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली पाहायला मिळाली.  

Webtitle : uddhav thackeray seats on the chair of chief minister of maharashtra 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com