VIDEO | मुख्यमंत्री ठाकरेंची भाजपवर तुफान फटकेबाजी

VIDEO | मुख्यमंत्री ठाकरेंची भाजपवर तुफान फटकेबाजी

राज्यपालांच्या अभिभाषणला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली.

गरिबांना तीनचाकी रिक्षाच परवडते

विरोधकांवर यावेळी त्यांनी जोरदार निशाणा साधला. कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं हे आमच्या सरकारचं धोरण असल्याचं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. याबरोबरंच हे सरकार त्रिशंकू असल्याची टीका फडणवीसांनी केली होती. त्यावर उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही जनतेच्या मदतीसाठी एकत्र आलो, आणि गोरगरिब जनतेला तीन चाती रिक्षाच परवडते त्यामुळे आमचं तीन चाकी सरकारच त्या जनतेसाठी उपयोगी ठरेल. असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. 

नागरिकत्व कायद्यावरुनही भाजप सरकारला तासलं

इतर देशातील हिंदू घ्या, पण त्यांना ठेवणार कुठे, निर्वासितांची काळजी वाहणार कोण? नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सभागृहात सवाल करत सरकारला धारेवर धरलं. यासह सीमाभागातील मराठी बांधव इतके आक्रोश करत असताना त्यांच्यासाठी भाजपने केलं काय? असाही सवाल मागच्या सराकारवर उठवत ठाकरेंनी फडणवीसांवर सडकून टीका केली.  केंद्राने कायम कर्नाटकची बाजू घेतली. पण सीमा भागातील मराठी बांधवांसाठी सोबत या असाही सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला यावेळी दिला.

केंद्र सरकारवरंही घणाघात

राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. तर देशाची आर्थिक स्थिती कोमामध्ये आहे. आणि अशातंच मेक इन इंडियाचं काय झालं? त्यात किती करार झाले? गुंतवणूक आलीही असेल मात्र पुढे काय झालं? असे प्रश्न करत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवरंही निशाणा साधलाय. यासह धर्म आणि राजकरण एकत्र करण्याचा प्रयत्न भाजप करतंय ते थांबवा असाही सल्ला ठाकरेंनी यावेळी दिला.

यासह सावरकरांचं संपूर्ण हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का?  असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केलाय.

Web Title - Uddhav Thakarey's speech in vidhan sabha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com