VIDEO | उद्धव ठाकरेंच्या नावाच्या बॅनर्सचं गौडबंगाल काय?

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स लागलेयेत. पण यावरनं एक वेगळाच तर्क मांडला जातोय. पाहुयात एक यासंदर्भातील सविस्तर विश्लेषण...

मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स लागलेयेत. पण यावरनं एक वेगळाच तर्क मांडला जातोय. पाहुयात एक यासंदर्भातील सविस्तर विश्लेषण...

राज्याच्या राजकीय पटलावर सध्या मॅरेथॉन घडामोडी घडतायंत. त्यातच आता मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अशी बॅनर्स लागलीयेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री अशी बॅनर्स लागून काही दिवस उलटत नाहीत तोच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा अशा आशयाची ही नवी बॅनर्स चर्चेचा विषय ठरतायंत. मात्र या बॅनर्सना अंतर्गत बंडाळीची किनार असल्याची चर्चा आहे. ५ वर्ष भाजप-शिवसेना सत्तेत असताना शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्रीपदं उपभोगली. त्यातील काही मंडळी तर लोकांमधून थेट निवडूनही आली नव्हती, अशी तक्रार कायमच शिवसेनेतला एक गट करत आलाय. त्यांनाही आता मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडू लागल्यानं शिवसेनेतील एका जहाल गटानं ही बॅनर्स लावल्याची चर्चा आहे.

WEB TITLE : UDDHAV THAKREY'S NAMES BANNERS AS CM OF MAHARASHTRA


संबंधित बातम्या

Saam TV Live