'मैं भुले हुए वादेको याद दिलाने आया हुं'; अयोध्येतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

'मैं भुले हुए वादेको याद दिलाने आया हुं'; अयोध्येतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

अयोध्या : "'तुम्ही इथे का येत आहात असे मला अनेकांनी विचारले ? यामध्ये काय राजकारण आहे का? मात्र, यामध्ये मी कोणतेही राजकारण करणार नाही'', असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) सांगितले. तसेच आता राम मंदिराची तारीख सांगावीच लागेल, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे : 

- आजचा दिवस माझ्या आयुष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा

- राम श्रीरामांचे मंदिर व्हायलाच हवे.

- झोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला आलोय.

- आता चला आपण सर्व मिळून मंदिर बनवू 

- अनेक महिने वर्षे झाली पण राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नाही.

- आता मला राम मंदिर बांधणी कधी होणार याची तारीख हवी

- अध्यादेश आणायचा असेल तर सरकारने तो आणावा.

- राम मंदिरासाठी कायदा आणत असाल तर तेही सांगावे.

- नोटांबदीचा निर्णय घेतला त्याप्रमाणे हा देखील निर्णय घ्यावा.

- तुम्ही विसरलेल्या वचनांची माहिती देण्यासाठी आज मी येथे आलोय.

- मंदिर बनविण्यासाठी हिंमत लागते. छाती कितीही मोठी असली त्यामध्ये मर्दासाऱखे हृदय असणे गरजेचे आहे.

- आता हिंदू गप बसणार नाही.

- 'हर हिंदू की एक पुकार पहले राम मंदिर फिर सरकार', असेही ते म्हणाले.

 

WebTitle : marathi news uddhv thackeray laxman killa speech targets bjp on ram mandir 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com