डीजेचा आवाज वाढणारच - उदयनराजेंनी आक्रमक पवित्रा   

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

एकीकडे कोर्टानं डीजे आणि डॉल्बीला परवानगी नाकलीय. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा होत असतानाच डॉल्बी विरोधात पोलिस प्रशासनानं धडक मोहीम उघडलीय..काल गणेश आगमन मिरवणुका होत्या, रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती मंडपामध्ये दाखल होत होत्या.

याच काळामध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून 27 जणांवर कारवाई करण्यात आलीय. तर कालपासून आतापर्यंत दहा लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलंय..त्यामध्ये साऊंड सिस्टिम आणि इतर साहित्याचा समावेश आहे.

कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातल्या अनेक गावांमध्ये ही कारवाई करण्यात आलीय. दरम्यान साताऱ्याचे खासदार उदयनराजेंनी डीजेचा आवाज वाढणार असं सांगत थेट यंत्रणांनाच आव्हान दिलंय. मंगळवार तळं माझ्या मालकीचं असून तिथे काय करायचं, काय नाही ते मी ठरवणार असं सांगून उदयनराजेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live