विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश

विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश

UGC म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश दिलेत.

या दिवशी सशस्त्र दलांतील जवानांच्या बलिदानाबाबत माजी सैनिकांचे संवाद सत्र, विशेष परेड, प्रदर्शनांचे आयोजन तसेच सशस्त्र दलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शुभेच्छापत्रे पाठविण्यात यावीत असंही यूजीसीने आपल्या आदेशात म्हटलंय.

२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करीत सर्जिकल स्ट्राइक केले होतं. विशेष दलाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीच्या तयारीतील दहशतवाद्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते.

भारतीय जवानांच्या या यशाची आठवण म्हणून विद्यापीठांत हा दिवस साजरा करण्याच्या सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.

WebTitle :marathi news UGC asks universities to celebrate 29th September as surgical strike day 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com