आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका, UIDAIचं लोकांना आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

कुणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नये, असं आवाहन आधार जारी करणाऱ्या प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे. आधार क्रमांक जाहीरपणे शेअर करणं चुकीचं आहे. कायद्यानुसार तसं करुही नये. आधार एक विशिष्ट ओळख असून त्यावर विविध प्रकारचे फायदे, सबसिडी मिळते. इतरांच्या आधार क्रमांकाचा वापर करणं हे देखील गुन्हा आहे.

असं केल्यास आधारच्या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद आहे, असं यूआयडीएआयने म्हटलं आहे. आधार कार्ड अनिवार्य केल्यामुळे सध्या गोपनीय माहितीबद्दल सुप्रीम कोर्टापासून ते सर्वसामान्यांपर्यंत चर्चा आहे. यातच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे चेअरमन आर एस शर्मा यांनी स्वतःचा आधार क्रमांक शेअर करुन ते हॅक करुन दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. यावर झालेल्या वादानंतर आता आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका, असं आवाहन करण्यात आलंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live