'उज्ज्वला' योजनेत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

नाशिक - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत सात कोटी २३ लाख जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक कोटी ३१ लाख जोडण्यांद्वारे उत्तर प्रदेशाने आपले अव्वलस्थान कायम ठेवले आहे. पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा यांनी महाराष्ट्राला पिछाडीवर टाकले असून महाराष्ट्रात आतापर्यंत ४० लाख ९४ हजार घरांमध्ये गॅसची जोडणी पोचली आहे.

एलपीजी जोडणी नसलेल्या गरीब कुटुंबांसाठी पंतप्रधान उज्ज्वला योजना असून कुटुंबातल्या प्रौढ महिलेच्या नावाने जोडणी मिळते.

www.pmujjwalayojana.com हे संकेतस्थळ योजनेसाठी विकसित करण्यात आले आहे. तसेच योजनेची चौकशी, तक्रारी आणि सूचनांसाठी १८००२६६६६९६ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०१७ ला देण्यात आलेल्या जोडण्यांचा विचार करता, राज्याच्या क्रमवारीत आतापर्यंत फरक पडला नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये ३१ मार्च २०१७ ला साडेसात लाख जोडण्या देण्यात आल्या होत्या.

Web Title: ujjwala gas scheme connection maharashtra seventh

संबंधित बातम्या

Saam TV Live