उल्हासनगरमध्ये घरफोडीचे आरोपी असलेले माय लेक अखेर अटक

उल्हासनगरमध्ये घरफोडीचे आरोपी असलेले माय लेक अखेर अटक

उल्हासनगर  : घरात घुसून मारहाण करण्याच्या गुन्हयात तारखेला हजर राहत नसल्याने कल्याण न्यायालयाने 21 सप्टेंबर 2017 ला फरार घोषित केलेल्या माय-लेकाला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी राहत असलेल्या झोपडपट्या उध्वस्त केल्यावर त्यांचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी केलेल्या शोधक कामगिरीमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या टीमने वरिष्ठांची शाबासकी मिळवली आहे.

1999 साली विठ्ठलवाडी पूर्वेला रेल्वे स्टेशनच्या बाहेर बांधण्यात आलेल्या अनधिकृत झोपडपट्टीत राहणारे राजू सुडगे, त्याची पत्नी शकुंतला व मुलगा शाम यांनी एकाला घरात घुसून मारहाण केली होती .कोळशेवाडी पोलिसांनी त्यांना अटक केल्यावर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. मात्र, तेव्हा पासून अनेकदा समन्स, जामीनपात्र वॉरंट, अजामीनपात्र वॉरंट, जामीनदारास नोटिसा बजावल्यावरही आरोपी तारखेला हजर राहत नसल्याने न्यायालयाने 21 सप्टेंबर 2017 ला तिघांनाही फरार घोषित करून आरोपींचा शोध घेऊन त्यांना हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

दरम्यान,  आरोपी ज्या झोपडपट्टी परिसरात राहत होते, त्या अनधिकृत असल्याने रेल्वेने उध्वस्त केल्या होत्या. त्यामुळे आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढणे कल्याणच्या पोलिसांना आव्हानात्मक ठरले होते. अशावेळी उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय पालांडे यांनी विठ्ठलवाडी पूर्वेतील दुकानदाराला विश्वासात घेऊन आरोपींविषयी विचारणा केली असता,त्यांच्या विषयी माहित नाही. पण त्यांची मुलगी एका गुन्ह्यात नुकतीच आधारवाडी कारागृहातून बाहेर आली आहे. अशी माहिती सांगितल्यावर गुन्हे अन्वेषणची टीमने यंत्रणेचे जाळे पसरवले. आधारवाडी कारागृहात जाऊन आरोपीच्या मुलीचा पत्ता मिळवला. ती उल्हासनगरातील सह्याद्री नगरात राहत असल्याचा पत्ता मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय पालांडे, सुरेंद्र पवार, हवालदार संजय माळी, प्रशांत तावडे, गुरुनाथ जंगम, बाबू जाधव, महिला पोलीस माया तावडे यांनी सह्याद्री नगर गाठले. मुलीच्या घरासमोरच न्यायालयाने फरार घोषित केलेली आई शकुंतला सुडगे व भाऊ शाम सुडगे पोलिसांना मिळून आले. राजू सुडगे याचे 2010 मध्ये निधन झालेले आहे. आरोपी माय-लेकाला कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या सुपूर्द करण्यात आल्यावर न्यायालयाने त्यांची आधारवाडी कारागृहात रवानगी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली

Web Title: the absconding mother and son was arrested In the Ulhasnagar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com