अयोध्येत मंदिराशेजारी मशीद नको : उमा भारती

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : हिंदू हे सर्वाधिक सहिष्णु आहेत, पण अयोध्येत राममंदिराच्या शेजारी मशीद उभारण्यात आली, तर मात्र त्यांच्या संयमाचा बांध फुटेल, असे मत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी आज मांडले. राममंदिराच्या पायाभरणीला अयोध्येमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही उपस्थित राहावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

मदिना आणि व्हॅटिकन सिटीमध्ये मंदिर उभारले जाऊ शकत नसेल, तर अयोध्येमध्ये मशिदीच्या उभारणीची गोष्ट करणे योग्य नाही, अयोध्येतील मुद्दा हा श्रद्धेच्या वादाचा नाही, तर तो जमिनीच्या वादा आहे. कारण अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे. न्यायालयाच्या बाहेरदेखील यावर तोडगा काढला जाऊ शकतो. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, बसपच्या नेत्या मायावती आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीदेखील याला पाठिंबा द्यावा, असे भारती यांनी नमूद केले. 

राममंदिराच्या मुद्यावर आम्हाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा हवा आहे. कॉंग्रेस, मायावतींप्रमाणेच डाव्या पक्षांनीदेखील राष्ट्रहिताच्या नजरेतून त्याला पाठिंबा द्यावा. पण, याच पक्षांना हा प्रश्‍न सोडवायचा नाही. कॉंग्रेसने धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करण्याची वृत्ती सोडून द्यायला हवी. राममंदिराच्या उभारणीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, यासाठी प्राणार्पण करण्याची वेळ आली, तरीसुद्धा मी मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जगातील कोणतीच ताकद आम्हाला अयोध्येत राममंदिर उभारण्यापासून रोखू शकत नाही. हा मुद्दा सध्या न्यायालयाच्या विचाराधीन असल्याने मला यावर काहीही बोलायचे नाही. 
केशवप्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री, उत्तर प्रदेश 

संबंधित बातम्या

Saam TV Live