देवळाली स्टेशन उडवून देण्याच्या धमकीनंतर देवळाली स्टेशन परिसरात आढळली बेवारस बॅग  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

नाशिकच्या देवळाली स्टेशन परिसरात बेवारस बॅग सापडल्यानं खळबळ उडालीये. पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. दरम्यान सकाळीच देवळाली स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. आता सैनिकी आरामग्रुहाच्या आवारात बॅग सापडल्याने एकच खळबळ उडवली आहे.   

पोलिस आयुक्तालयाकडे यासंदर्भात निनावी चिठ्ठी आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस आणि प्रशासन सतर्क झालं. सर्व पोलिसांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्यात. तसंच रेल्वे स्टेशनवर सुरक्षा वाढवण्यात आलीय. बॉम्बशोधक पथकाकडून याठिकाणी रेल्वे स्टेशनवर तपासणी करण्यात येतेय. तसंच श्वान पथकही याठिकाणी दाखल झालंय.

WebTitle : marathi news unidentified bag found near devlali station nashik 

संबंधित बातम्या

Saam TV Live