कर्जदारांना दिलासा, युनियन बँक, बँक ऑफ बडोदाची दर कपात

साम टीव्ही
शनिवार, 11 जुलै 2020

युनियन बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड कर्जदरात शून्य पूर्णांक २० ची कपात केलीय. ही कपात सर्व मुदतींच्या कर्जांसाठी केली गेली असून ती आजपासून लागू झालीय.

युनियन बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड कर्जदरात शून्य पूर्णांक २० ची कपात केलीय. ही कपात सर्व मुदतींच्या कर्जांसाठी केली गेली असून ती आजपासून लागू झालीय. एक वर्ष मुदतीच्या कर्जासाठी MCLR ७.६० टक्क्यांवरून ७.४० टक्के करण्यात आलाय. बँक ऑफ बडोदाने 'MCLR'मध्ये ०.०५ टक्के कपात केली असून, उद्यापासून नवे कर्जदर लागू होतील.

 यानुसार एक वर्ष मुदतीच्या कर्जाचा दर ७.६५ वरून ७.६० टक्के होईल. सहा महिने मुदतीच्या कर्जाचा दर ७.५० टक्क्यांवरून ७.४५ टक्के करण्यात आलाय. इंडियन ओव्हरसीज बँकेने MCLR पाव टक्क्याने कमी केलाय. त्याचप्रमाणे कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रनेही MCLR अनुक्रमे ०.१० आणि ०.२० टक्के कमी केलाय..  याआधी भारतीय स्टेट बँकेने कालपासून नवे MCLR कर्जदर लागू केले.

 दरम्यान, देशातील कोरोना रुग्णसंख्येने आता 8 लाखाचा टप्पा ओलांडलाय. दर दिवशी सरासरी 25 हजार रुग्ण देशभरात आढळून येत असल्यानं आता चार दिवसांच लाखभर रुग्ण देशात वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणेवरचा ताण प्रचंड वाढलाय. सध्या देशाची एकूण रुग्णसंख्या 8 लाख 20 हजार 916 वर पोहोचली आहे. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत 5 लाखाहून अधिक रुग्ण बरे झालेत. दिलासादायक बाब म्हणजे एक्टीव रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. रुग्णसंख्येत भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे. आतापर्यंत देशात 22 हजारहून अधिक रुग्ण दगावलेत. तर गेल्या 24 तासांत 519 जणांचा मृत्यू झालाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live