अर्थसंकल्पातून नवभारताची निर्मिती: देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सादर केलेला अर्थसंकल्प हा नवभारताच्या निर्मितीकडे जाणारा आहे. अनेक ऐतिहासिक निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेती, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांवर जोर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. 

फडणवीस म्हणाले, की शेतकऱ्यांना त्यांच्या हमीभावापेक्षा अधिक 50 टक्के देण्यात आली आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. आरोग्यासाठी करण्यात आलेल्या योजनेचा 5 लाख कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे. मुद्रा योजनेतून अनेक नागरिकांना फायदा झाला आहे. या योजनेसाठी 3 लाख कोटी रुपये अधिक देण्यात आले आहेत यामुळे युवकांना काम मिळणार आहे. उज्वला योजनेतून पाच कोटी महिलांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने एवढी तरतूद केलेली नाही. मुंबईच्या रेल्वेसाठी 40 हजार कोटी रुपये देण्यात आले. सामान्य मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रय़त्न करण्यात आला आहे. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे अभिनंदन करतो.

संबंधित बातम्या

Saam TV Live