सर्व क्षेत्रातील नवीन कर्मचाऱ्यांचा 12 टक्के पीएफ सरकार भरणार : अरुण जेटली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : येत्या वर्षात देशात 70 लाख नव्या रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. या सर्व क्षेत्रातील नवीन कर्मचाऱ्यांचा 12 टक्के पीएफ सरकार भरणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. याशिवाय लघू उद्योगांसाठी 3794 कोटींची तरतूदही केली जाणार असल्याचे जेटली यांनी सांगितले.

2018-19 वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेत सादर केले जात आहे. त्यादरम्यान जेटली यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, देशातीस लघू उद्योगांसाठी 3794 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी 70 लाख नव्या रोजगारांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर आता येत्या वर्षातही 70 लाख नव्या रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे, असे जेटली यांनी सांगितले. 

याशिवाय सर्व क्षेत्रातील नवीन कर्मचाऱ्यांचा 12 टक्के पीएफ सरकार भरणार आहे. गंगा स्वच्छतेसाठी 1080 प्रकल्प सुरु केला जाणार आहे. तसेच गंगाकाठी शौचालये उभारून स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

तसेच अनुसूचित जातींच्या विकासासाठी 56 हजार कोटींचा निधी दिला जाणार असून, मुद्रा योजनेअंतर्गत 3 लाख कोटी रुपये कर्ज देण्याचे उद्दिष्ट सरकारचे असणार आहे. 187 प्रकल्प नमामी गंगे प्रकल्पाअंतर्गत मंजूर, त्यातील 47 योजना पूर्ण झाले आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live