2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : अरूण जेटली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

देशातील शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी 585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आमच्या सरकारचे आहे. तसेच शेतीक्षेत्रासाठी योजना आणण्यासाठी सरकार कटीबद्ध असेल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी 585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आमच्या सरकारचे आहे. तसेच शेतीक्षेत्रासाठी योजना आणण्यासाठी सरकार कटीबद्ध असेल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

2018-19 वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेत सादर केले जात आहे. त्यादरम्यान जेटली यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था प्रगती करत आहे. सध्या देशातील शेतीतील उत्पादन रेकॉर्ड ब्रेक आहे. केंद्र आणि नीती आयोग शेतकऱ्यांना योग्य उत्पादन मिळण्यासाठी प्रय़त्न करणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्याचा सरकारचे प्रयत्न राहतील. याशिवाय 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट या सरकारचे असणार आहे.  याशिवाय फळांचे 3 लाख कोटींचे उत्पादन, 27.5 मिलियन टन अन्नधान्याचे उत्पादन होत आहे, शेतीक्षेत्रासाठी योजना आणण्यासाठी सरकार कटीबद्ध असेल. गरिब जनतेसाठी आरोग्य सुविधा कमीदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

तसेच तिकीटांसह सर्व कागदपत्रे ऑनलाईन मिळत असल्याने 'डिजिटल इंडिया'कडे कल वाढत आहे. 4 कोटी घरांपर्यंत वीज पोचविण्याचे काम सध्या सुरु आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live