श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर आढळला एक वेगळाच मासा..  

श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर आढळला एक वेगळाच मासा..  

रायगड : दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर वर भलामोठा देवमासा सापडल्यानंतर आता श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर अद्भुत मासा सापडला आहे. रात्री समुद्राच्या लाटांसोबत मृत अवस्थेत हा मासा किनाऱ्यावर आला. आठवड्याभरात दोनदा अशा प्रकारे वेगळे मासे किनाऱ्यावर आल्याने माशाला पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील लोकांनी आणि पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे.

साधारणता 5 फूट लांब आणि दीड फूट जाडीचा हा मासा असून त्याच वजन अंदाजे 100 किलो असल्याचे सांगितले जात आहे. गोबरा माशाप्रमाणे हा मासा दिसत असून आकाराने तोंडाकडे मोठा तर शेपटीकडे निमुळता असून अंगावर चकाकणारा सोनेरी रंग आहे. शिवाय या माशाच्या अंगावर काळे ठिपके असून एखाद्या तीक्ष्ण बाणासारखे काटे देखील आहेत.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मधील समुद्र किनाऱ्यावर हा अद्भुत मासा सापडला असून या माशाला पाहण्यासाठी आसपासच्या लोकांसह पर्यटकांनी किनाऱ्यावर मोठी गर्दी केली आहे. खोल समुद्रात सापडणारा हा मासा भरती - ओहोटीमुळे किंवा एखाद्या बोटीच्या पंख्याला धडकून जखमी झाल्याने हा मासा किनाऱ्यावर आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन आणि मत्स्य विभागाला याची माहिती देण्यात आली असून लवकरच या माशाची विल्हेवाट लावली जाणार आहे.
 

WebTitle : marathi news unique fish found on the sea face of shrivardhan 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com