युनायटेड एअरलाईन्सची इराणच्या हवाईहद्दीतील मुंबई-नेवार्क विमान सेवा रद्द

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई 
शुक्रवार, 21 जून 2019

अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव शिगेला पोहचलाय. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेलं वाकयुद्ध आता खऱ्याखुऱ्या युद्धावर येऊन ठेपतं की काय अशी स्थिती निर्माण झालीय. पण या दोन्ही देशांमधल्या वाढत्या तणावाचा फटका भारतीय विमान प्रवाशांना बसण्याची शक्यता अधिक आहे. कारण अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सनं मुंबई ते नेवार्क मधील विमान उड्डाण सेवा रद्द केलीय.

मुंबईहून अमेरिकेला जाणारं विमान इराणच्या हवाई क्षेत्रातून जात असल्यानं अमेरिकेनं हा निर्णय घेतलाय. अलिकडेच इराणनं अमेरिकेचं ड्रोन पाडलं. तर ओमानच्या खाडीत तेलावाहू जहाजांवर संदिग्ध हल्ले झाले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं इराणच्या हद्दीतून जाणारी विमानसेवा बंद केलीय. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला मोठी चाट बसू शकते. याशिवाय येत्या काळात भारतात इंधनाचे दर गगनाला भिडू शकतात. 

एकंदरीतच अमेरिका आणि इराकमधील युद्धाची स्थिती भारतासारख्या देशासाठी महागाईचे संकेत देणारी आहे. खनिज तेलाच्या बाबतीत भारत पूर्णपणे परावलंबी आहे...आणि अमेरिकेसारखं राष्ट्र याच संधीचं सोनं करू पाहतंय. जे भारताला कधीही परवडण्यासारखं नाही.

WebTitle : marathi news United Airlines Suspends Newark-Mumbai Flights Over Iran Airspace tension

संबंधित बातम्या

Saam TV Live