PUNE | येरवड्यात स्त्याच्याकडेला लावलेल्या गाड्यांची तोडफोड

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

पुणे : रस्त्याच्याकडेला लावलेल्या वाहनांची अनोळखी व्यक्तींनी तोडफोड करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील शिवाजी पुतळा येथे घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Image may contain: car and outdoor

सचिन शेलार (वय 38, रा. नवी खडकी, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेलार यांच्याकडील कार, रिक्षा व व्हॅन अशा गाड्या त्यांनी येरवड्यातील शिवाजी पुतळा येथे लावल्या होत्या. त्यांच्या अन्य सहकाऱ्यांचीही व्हॅन संबंधित ठिकाणी लावण्यात आल्या होत्या. सोमवारी पहाटे तीन वाजता जिजामाता परिसरामध्ये राहणाऱ्या सात ते आठ जण शिवाजी चौक येथे जमा झाले. त्यांनी रस्त्यावरील दगड उचलून फिर्यादी यांच्या गाड्यांची तोडफोड केली. त्याचबरोबर फिर्यादी यांच्या अन्य सहकाऱ्यांच्याही गाड्या आरोपींनी फोडल्या. 

No photo description available.

या घटनेत गाड्यांच्या काचा फुटल्याने फिर्यादी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भूषण कोते करीत आहेत. 
 
Web Title: unknown people sabotage cars in yerawada area police booked charges
 
संबंधित बातम्या

Saam TV Live