वाचा, 1 सप्टेंबरपासून काय बदल होतील...

साम टीव्ही
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

राज्यात अनलॉक 4 ची नियमावली जाहीर झालीय. ई पासची अट रद्द करण्यात आलीय. खासगी बससेवा सुरू करण्यात आलीय. तर शाळा, कॉलेज, मेट्रो आणि सिनेमागृहही बंद राहतील.

राज्यात अनलॉक 4 ची नियमावली जाहीर झालीय. ई पासची अट रद्द करण्यात आलीय. खासगी बससेवा सुरू करण्यात आलीय. तर शाळा, कॉलेज, मेट्रो आणि सिनेमागृहही बंद राहतील. मंदिरं, जीमही बंदच राहणार आहे. हॉटेल, लॉज सुरू होणार आहे. धार्मिक स्थळांबद्दल अजून निर्णय झालेला नाहीये.

कोरोना साथीचा जबर फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसलाय. 30 जून रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 23.9 टक्क्यांनी घसरलाय. गेल्या चाळीस वर्षांतली जीडीपीतली ही सर्वात मोठी पडझड आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीतूनही बाब समोर आलीय. लॉकडाऊन काळात उद्योगाला मोठा फटका बसल्याने जीडीपी आक्रसलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live