भारतात मंदीचे ढग गडद ; भारतीय अर्थव्यवस्थेने गाठला 70 वर्षातील तळ - नीति आयोग उपाध्यक्ष

भारतात मंदीचे ढग गडद ; भारतीय अर्थव्यवस्थेने गाठला 70 वर्षातील तळ - नीति आयोग उपाध्यक्ष

नवी दिल्ली: भारतात मंदीचे ढग गडद होत चालले आहेत. आता नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था सध्या कठीण परिस्थितून जात आहे. गेल्या 70 वर्षातील सर्वात वाईट अवस्थेला सध्या भारतीय अर्थव्यवस्था तोंड देत असल्याचे गंभीर वक्त्यव्य राजीव कुमार यांनी केले आहे. 

''रिझर्व्ह बँकेकडून रेपोदरात कपात करण्यात आली आहे. मात्र खासगी क्षेत्राला अजूनही सहज कर्ज उपलब्ध होत नाहीये. शिवाय नोटाबंदी आणि त्यापाठोपाठ कर रचनेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आलेल्या वस्तू आणि सेवाकरामुळे (जीएसटी) अर्थव्यवस्थेत रोखीचे संकट वाढले आहे. आता सरकारकडून लवकरात लवकर पाऊले उचलले जाण्याची आवश्यकता आहे,'' असे  राजीव कुमार म्हणाले.  नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेतील रोखीचे प्रमाण कमी झाले आहे. नोटाबंदी आधी सुमारे 35 टक्के रोखी उपलब्ध होती, आता मात्र ती कमी झाली आहे. यामुळे स्थिती अत्यंत अवघड बनली आहे, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. 

ते म्हणाले, "मला वाटते खाजगी क्षेत्रातील काही शंका दूर करण्यासाठी सरकारने जे काही करता येईल ते करायला हवे. खाजगी क्षेत्रातील भिती दूर करण्यासाठी सरकारने आवश्यक पाऊले उचलणे गरजेचे आहे." 

जानेवारी ते मार्च या कालावधीत जीडीपीची वाढ 5.8 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. परिणामी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावला आहे. खाजगी गुंतवणूक, रोखतेची कमी (लिक्विडिटी क्रंच) आणि मुख्य क्षेत्रातील कंपन्यांची खालावलेली कामगिरीमुळे आर्थिक वाढीचा वेग कमी झाला आहे. आर्थिक वाढीचा अंदाज देखील कमी करण्यात आला असून तो आता 7 टक्क्यांच्या खाली आला आहे.  जागतिक व्यापारातील तणावामुळे विशेषत: अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे आशियातील अनेक देशांना फटका बसला आहे. 


WebTitle : marathi news Unprecedented situation for govt in 70 years says NITI aayog VC

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com