अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 मार्च 2018

अवकाळी पावसामुळे पिकांवर संकट आलंय.  राज्याच्या काही भागात रविवारी पावसानं हजेरी लावली. डोंबिवली, कल्याणमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली. तर नवी मुंबईतही काही वेळ पाऊस झाला. दरम्यान पुणे जिल्ह्यातील काही भागात वा-यासह पावसाने दमदार हजेरी लावली, तर काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतक-यांची त्रेधा उडाली. या अवकाळी पावसानं शेतमालाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी धास्तावलेत. नाशिकमध्ये रविवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे काहीशी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 5 मिनिटांच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

अवकाळी पावसामुळे पिकांवर संकट आलंय.  राज्याच्या काही भागात रविवारी पावसानं हजेरी लावली. डोंबिवली, कल्याणमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली. तर नवी मुंबईतही काही वेळ पाऊस झाला. दरम्यान पुणे जिल्ह्यातील काही भागात वा-यासह पावसाने दमदार हजेरी लावली, तर काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतक-यांची त्रेधा उडाली. या अवकाळी पावसानं शेतमालाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी धास्तावलेत. नाशिकमध्ये रविवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे काहीशी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 5 मिनिटांच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. आता वातावरणात उन्हाचा चटका जाणवत असला तरी शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली नाही. दरम्यान बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेले दोन दिवसापासून जिल्यातील ढगाळ हवामान आणि पाऊस सदृश वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे आंबा, काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live