तितली चक्रीवादळाची तीव्रता कमी; अरबी समुद्रातील लुबन चक्रीवादळ अतितिव्र

तितली चक्रीवादळाची तीव्रता कमी; अरबी समुद्रातील लुबन चक्रीवादळ अतितिव्र

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली चक्रीवादळ गुरुवारी (ता. ११) ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे ओडिसातील गजपती, गंजम, नयागड कांढामाळ आणि रायगड परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. परिणामी अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी (ता. १२) या चक्रीवादाची तीव्रता कमी होण्यास सुरवात झाली असून ते पुढे गोपाळपूरकडे सरकत आहे. ओडिसाच्या किनारपट्टीला धडकल्यानंतर या चक्रीवादळाच्या वाऱ्याचा ताशी वेग ८०- ९० किलोमीटर एवढा होता. त्यानंतर तो कमी होऊन ताशी वेग ५५ ते ६५ किलोमीटरपर्यंत खाली आहे.

आज (ता. १२) या चक्रीवादळाची तीव्रता कमी होईल. अरबी समुद्रातील लुबन हे चक्रीवादळ अतितिव्र झाले आहे. त्यामुळे समुद्रातील लाटांचा वेग वाढला आहे. मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही चक्रीवादळाच्या प्रणालीमुळे गुरुवारी (ता. ११) दिवसभर राज्यातील काही भागात ढगाळ हवामान होते. अनेक भागांत उन्हाचा पारा चढून उकाड्यात वाढ झाली होती. 

लुबन चक्रीवादळाचा प्रवाह अधिक असल्याने वारे वेगाने वाहत आहे. गुरुवारी वाऱ्याचा ताशी वेग १४५ ते १६० किलोमीटर एवढा होता. आज या वाऱ्याचा वेग ताशी १३० ते १५० किलोमीटरच्या दरम्यान राहणार आहे. चक्रीवादळ ओमानमधील सलालाहच्या किनारपट्टीपासून ५००, तर येमेनमधील साकोट्रापासून ४९०, तर अलगैदाहपासन ६७० किलोमीटर अंतरावर असून ते दक्षिण ओमानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आकाश निरभ्र झाले असून कमाल तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भातील अकोला येथे ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.  

WebTitle : marathi news updates of titli cyclone and luban cyclone 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com