#Ban_China | भारतानंतर आता अमेरिकाही चीनला हाकलणार

साम टीव्ही
बुधवार, 1 जुलै 2020

चिनी अॅपवर भारतात बंदी, अमेरिकाही चीनला हाकलणार
भारतानंतर अमेरिकेनेही चीनविरुद्ध कंबर कसली
HUAWEI आणि ZTE च्या उत्पादनांवर अमेरिकेत बंदी

एकीकडे चीनच्या 59 ऍपवर बंदी घालत भारतानं चीनला मोठा दणका दिलाय. त्यातच आता अमेरिकेनंही चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. अमेरिकेनं मोठं पाऊल उचलत चीनच्या बड्या कंपन्यांना धक्का दिलाय. 

आपल्या देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू असतानाच 59 चिनी अॅपवर भारताने बंदी घातलीय. भारताने घेतलेल्या कठोर निर्णयानंतर जागतिक महासत्ता अमेरिकेनेही चिनी वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच चीनच्या HUAWEI आणि ZTE कंपन्यांच्या उत्पादनांवर अमेरिकेत आता बंदी घालण्यात आलीय. कोरोनाच्या संकटात चीनची भूमिका आणि जागतिक संकटातही चीनची युद्धखोरी बघता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही चीनवर चांगलेच संतापलेत. त्यांनी चीनवरचा संताप ट्विट करून जगजाहीर केलाय.

कोरोनामुळे संपूर्ण जग अडचणीत आहे. अमेरिकेतही कोरोनाने हाहा:कार माजवलाय. यामागे चीनचाच हात आहे हे आता सर्वांनाच माहित आहे. म्हणून अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून चीनविरोधात माझा संताप वाढत चाललाय

सध्या अमेरिकेने HUAWEI आणि ZTE या कंपन्यांच्या वस्तूंवर बंदी घातली असली तरी भारतानेही या कंपन्या आधीच ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यायत... कोरोनाच्या संकटात चीनने वेळोवेळी लपवाछपवीचा उद्योग केलाय आणि कोरोनाच्या संकटातही भारताच्या सीमेवर घुसखोरीचा आगाऊपणा केलाय... त्यामुळे चिनी ड्रॅगनचे वळवळणारे हातपाय बांधायलाच हवेत. त्यासाठी चिनी वस्तूंवर बंदी घालून या विखारी ड्रॅगनचं नाक-तोंड दाबायलाच हवं.

डोनाल्ड ट्रम्पही संतापले चीनवर

कोरोनामुळे संपूर्ण जग अडचणीत आहे. अमेरिकेतही कोरोनाने हाहा:कार माजवलाय. यामागे चीनचाच हात आहे हे आता सर्वांनाच माहित आहे. म्हणून अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून चीनविरोधात माझा संताप दिवसेंदिवस वाढत चाललाय


संबंधित बातम्या

Saam TV Live