अमेरिकेला जायचंय? लवकर करा व्हिसासाठी अर्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 एप्रिल 2018

नवी दिल्ली - अमेरिकेला सूटीसाठी जाण्याचा विचार करत अल्यास लवकरात लवकर व्हिसासाठी अर्ज करण्याचे अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने म्हटले आहे. याचे कारण म्हणजे सध्या मोठ्या प्रमाणावर अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज येत आहेत. त्यामुळे व्हिसाच्या मुलाखतीसाठी साधारण 30 दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या व्हिसासाठी महिनाभर आगोदर तरी अर्ज करण्याचे आवाहन दूतावासाने केला आहे. 

दरम्यान, भारतातून अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात. वर्षभरात जवळजवळ दहा लाख पेक्षा जास्त अर्ज येत असल्याने या अर्जांवर काम करण्यासाठी वेळ लागतो. गेल्या पाच वर्षात अमेरिकेला ज्यासाठी येणाऱ्या व्हिजा अर्जांमध्ये 60 टक्काने वाढ झाली असल्याचेही दूतावासाने म्हटले आहे. 

याचप्रमाणे अमेरिकेच्या दूतावासाच्या चार कार्यालयांमध्ये व्हिसाच्या अर्जांवर काम केले जाते. या कामामध्ये सतत सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही दूतावासाने म्हटले आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live