VIDEO | केमिकलयुक्त साबण, मेहंदी वापरताय, सावधान !

संजय डाफ साम टीव्ही नागपूर
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

लग्नसराई सुरूय. अनेकजण मेहंदी लावतात. पण, तुम्ही जर स्वस्तातली मेहंदी, केमिकलयुक्त साबण वापरत असाल तर सावध व्हा. कारण, स्वस्तातली मेहंदी हाताला, पायाला, आणि केसांना लावल्याने त्वचारोग होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. इतकंच नव्हे तर मेडिकेटेड साबण शरीराला लावल्याने शरीराला फायदा पोहोचवणारे बॅक्टेरियाही मरून जातात. पण, हे खरं आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा. स्वस्त मेहंदी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केमिकलयुक्त साबण वापरू नका.यामुळे त्वचारोग, त्वचेला खाज सुटते, मेहंदीत केमिकल वापरत असल्याने त्वचेचे आजार होतात.

लग्नसराई सुरूय. अनेकजण मेहंदी लावतात. पण, तुम्ही जर स्वस्तातली मेहंदी, केमिकलयुक्त साबण वापरत असाल तर सावध व्हा. कारण, स्वस्तातली मेहंदी हाताला, पायाला, आणि केसांना लावल्याने त्वचारोग होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. इतकंच नव्हे तर मेडिकेटेड साबण शरीराला लावल्याने शरीराला फायदा पोहोचवणारे बॅक्टेरियाही मरून जातात. पण, हे खरं आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा. स्वस्त मेहंदी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केमिकलयुक्त साबण वापरू नका.यामुळे त्वचारोग, त्वचेला खाज सुटते, मेहंदीत केमिकल वापरत असल्याने त्वचेचे आजार होतात. हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. अनेक जण हाता,पायाला आणि केसांनाही मेहंदी लावतात...बाजारात आलेले केमिकलयुक्त साबण वापरतात...त्यामुळं याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी त्वचारोग तज्ज्ञांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच असं होऊ शकतं का? हे जाणून घेतलं.

अनेकजण केमिकलयुक्त मेहंदी वापरतात. त्यामुळे अशी मेहंदी आपल्या त्वचेला हानिकारक ठरू शकते. पण, मेहंदी किंवा साबण वापरताना काय काळजी घ्यावी हेदेखील जाणून घेतलं... त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा.

 

 

केमिकलयुक्त साबण ठराविक काळासाठी आणि ठराविक पद्धतीने वापरावेत

केमिकलयुक्त साबणाने त्वचा कोरडी होणे, त्वचेवरील ऑईल आणि हेल्दी बॅक्टेरिया नष्ट होतात

त्वचा लाल होईल, इन्फेक्शन होण्याची भीती असते

बाजारात रेडिमेड मेहंदीमध्ये रंगांचा वापर केला जातो त्वचेवर इन्फेकशन होतं

केस गळून टक्कल पडू शकते, त्वचेवर इन्फेक्शन होऊ शकते

मेडिकेटेड सोपं डॉक्टरांनी जेवढे दिवस वापरायला सांगितली तेवढेच दिवस वापरावे...रेडिमेड मेहंदी वापरताना काळजी घ्या...नैसर्गिक मेहंदी वापरा...आमच्या पडताळणीत केमिकलयुक्त मेहंदी आणि साबण वापरल्याने त्वचारोग होऊ शकतो हा दावा सत्य ठरला...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live