हातगाडीवरून पत्नीचा मृतदेह नेला पाच किलोमीटर...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 मार्च 2018

आग्रा (उत्तर प्रदेश): मेनपुरी येथील जिल्हा रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्यामुळे पत्नीचा मृतदेह हातगाडीवरून पाच किलोमीटर अंतर पार करत घरी नेण्याची वेळ मजूर असलेल्या पतीवर आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हरिहारपूर येथील रहिवासी असलेले कन्हैयालाल यांनी सांगितले की, 'माझी पत्नी सोनी (वय 30) हिचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर 108 या नंबरवर फोन करून व रुग्णवाहिनीकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतु, बराच वेळ थांबल्यानंतरही कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही. यामुळे पत्नीला कपड्यांमध्ये घुंडाळून हातगाडीवर ठेवून अंत्यसंस्कारासाठी पाच किलोमीटर दूर असलेल्या घरी नेण्यात आले.'

मेनपुरी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. आर. के. सागर यांनी सांगितले की, 'कन्हैयालाल यांनी रुग्णवाहिकेबद्दल कोणतीही विचारणा केली नव्हती. आमच्या जबाबदारीवर मृतदेह नेत असल्याचे सांगितले होते.'

दरम्यान, हातगाडीवरून मृतदेहाचे नेण्यात येत असल्याची छायाचित्रे नेटिझन्सनी सोशल मिडियावर व्हायरल केल्यानंतर प्रशासनला जाग आली. या घटनेनंतर जिल्हाधिकारी प्रदिपकुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कन्हैयालाल व सोनी या दांपत्याला चार मुली आहेत. सर्वांत लहान मुलगी अवघी तीन महिन्यांची आहे. देशातील विविध भागांमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live