उत्तर प्रदेश, राजस्थानात धुळधाण करणाऱया वादळाचा धोका अद्याप कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 मे 2018

उत्तर प्रदेश, राजस्थानात धुळधाण करणाऱया वादळाचा धोका अद्याप कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशातील १८ राज्यांमध्ये येत्या ४८ तासांत धुळीचे वादळ धडकण्याचा आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने याबाबत ऍलर्टचा इशारा दिला आहे. दरम्यान, या वादळाने गेल्या दोन दिवसांत मृतांची संख्या १२९ वर गेली आहे. धुळीच्या वादळाने उत्तर प्रदेशात सर्वाधिक  ७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर राजस्थानात ३५, तेलंगणात ८, उत्तराखंडमध्ये ८ आणि पंजाबात २ जणांना जीव गमवावा लागला. शेकडो जण जखमी झाले. हजारो घरे कोसळली, शेकडो झाडे उन्मळून पडली.

उत्तर प्रदेश, राजस्थानात धुळधाण करणाऱया वादळाचा धोका अद्याप कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशातील १८ राज्यांमध्ये येत्या ४८ तासांत धुळीचे वादळ धडकण्याचा आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने याबाबत ऍलर्टचा इशारा दिला आहे. दरम्यान, या वादळाने गेल्या दोन दिवसांत मृतांची संख्या १२९ वर गेली आहे. धुळीच्या वादळाने उत्तर प्रदेशात सर्वाधिक  ७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर राजस्थानात ३५, तेलंगणात ८, उत्तराखंडमध्ये ८ आणि पंजाबात २ जणांना जीव गमवावा लागला. शेकडो जण जखमी झाले. हजारो घरे कोसळली, शेकडो झाडे उन्मळून पडली. सर्वात भयंकर स्थिती आग्रा शहर आणि जिल्हय़ात झाली असून येथे ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live