बस दरीत कोसळून 45 प्रवाशांचा मृत्यू 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 जुलै 2018

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 45 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नैनीडांडा ब्लॉक येथून रामनगरला जात असताना, बसवरील ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं अन् बस थेट 60 मीटर दरीत कोसळली.

या भीषण अपघातात बसमधील 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थली एनडीआरएफची टीम 3 हेलिकॉप्टरसह दाखल झाले आहेत. 28 सीटर बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय..
 
संबंधित बातम्या

Saam TV Live