उत्तराखंड गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे पहिले राज्य 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभेत महत्वपूर्ण विधेयक पारित करण्यात आले आहे. यामध्ये गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करण्यात आले आहे. गायीला राष्ट्रमाता घोषित करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य ठरले आहे. याबाबतचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.  
    
उत्तराखंडच्या पशूपालनमंत्री रेखा आर्य यांनी याबाबतचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. या प्रस्तावाबाबत आर्य यांनी सांगितले, की ''आपणा सर्वांना (विरोधक आणि सत्ताधारी) गायीचे महत्त्व माहिती आहे. गायींचा सन्मान फक्त भारतातच नाहीतर दुसऱ्या देशांमध्येही केला जातो. तसेच धार्मिक ग्रंथांमध्येही गायींचा उल्लेख करण्यात आला असून, गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात, असे म्हटले जाते. याशिवाय जर गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला तर तिच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलली जातील, जेणेकरुन गोहत्या बंद होतील.'' 

दरम्यान, या प्रस्तावावर उत्तराखंडच्या विरोधीपक्ष नेत्या इंदिरा हृदयेश यांनी सांगितले, की ''गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यास आमचा आक्षेप नाही. मात्र, असे करुन भाजपला नेमके काय साध्य करायचे, हे माहिती करता येणे सोपे वाटत नाही''.

WebTitle : marathi news uttarakhand first state to declare cows as rashtramata 

संबंधित बातम्या

Saam TV Live