उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; आंध्रप्रदेशलाही पावसाचा फटका

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 जुलै 2018

उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केलाय. जोरदार पावसामुळे चमोली भागात ढगफुटी झाल्याने अनेक दुकानांचं तसंच घरांचं मोठं नुकसान झालंय. तुफान पावसामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. पावसामुळे डोंगराचे कडे कोसळून मोठय़ा प्रमाणात माती, मलबा वाहुन येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. 

आंध्रप्रदेशलाही पावसाचा फटका
मुसळधार पावसाचा फटका आंध्रप्रदेशलाही बसलाय. जोरदार पावसामुळे श्रीकाकुलम इथे वम्माधारा नदीला पूर आलाय. या पुराच्या पाण्यात काही नागरिक अडकले होते. या 55 जणांची राज्य आपत्ती निवारण म्हणजेच NDRF पथकाकडून सुटका करण्यात आलीय. त्यांना सध्या सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय.
 
WebTitle : marathi news uttrakhand andra pradesh heavy rain monsoon 

संबंधित बातम्या

Saam TV Live