तुमच्यासोबत तुमचा व्हॉट्सअॅपही जाणार सुट्टीवर.... व्हॉट्सऍप लाँच करणार नवं फिचर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप  म्हणून ओळखलं जाणारं व्हॉटसअॅप आपल्या जगण्याचा एक भाग बनलंय. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्रीपर्यंत शेकडोवेळा आपण व्हॉटसअप चेक करतो, चॅटिंग करतो. पण बऱ्याचदा अनावश्यक मेसेजेस त्रासदायक ठरतात. पण व्हॉट्सअॅपनं यावर तोडगा काढलाय. सुट्टीवर असतांना व्हॉट्स अप वापरणे अधिक सोयीस्कर होणारंय.

कंपनी आपल्या बीटा व्हर्जनवर व्हेकेशन मोड या नवीन फिचरची चाचणी करतंय. त्यामुळे तुम्ही एकदा व्हेकेशन मोड ऑन केला की तुम्हाला येणारे मेसेजेस दिसणार नाहीत. अर्थात हे सर्व मेसेजेस अर्काईव्हमध्ये सेव्ह होत राहतील. त्यामुळे तुम्ही हवं तेव्हा ते मेसेजेस पाहू शकतात.

अर्थात हे नवं फिचर व्हॉट्सअॅपमध्ये कधी येणार हे मात्र कंपनीनं अद्याप स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे आताच तुमच्या सोबत तुमच्या व्हॉट्सअॅपला सुट्टीवर जाता येणार नाही. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live