VIDEO | पुण्यात विकला जातोय चक्क टॉयलेमध्ये वडापाव...

VIDEO | पुण्यात विकला जातोय चक्क टॉयलेमध्ये वडापाव...

टॉयलेटमध्ये वडापाव. ऐकूनच किळस येतोय. पण हे घडतंय, आणि तेही पुण्यात. नेमका हा प्रकार आहे, जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा...

पुणे पालिकेने महिलांसाठी मोबाईल टॉयलेट सुरु केले. आमच्या प्रतिनिधी पालिकेचं हे काम पुणेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बसपर्यंत गेल्या.

पण या बसमध्ये एंट्री करताच, त्यांना धक्काच बसला. टॉयलेटमध्ये चक्क वडापाव विकले जात होते. फक्त वडापावच नाही तर इथल्या फ्रिजमध्ये कोल्डींक सुद्धा विक्रीसाठी ठेवलेत. अर्थातच हा किळसाणा प्रकार पाहून महिलांनी नाक मुरडलंय. मुळात आता प्रश्न असा आहे, टॉयलेटमध्ये वडापाव विकण्याची कल्पना कुठल्या महाभागाच्या डोक्यात आली. बरं आलीच तरी त्या कल्पनेला हिरवा कंदील कुठल्या महाभागाने दिला. की पुणे मनपाचे हे अधिकारी दुपारी 1 ते 4 या वेळेत झोपेतच असे हिरवे कंदिल देत असतात? आता या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाने द्यायलाच हवी आहेत. कारण लोकांचं आरोग्य धोक्यात घालून पालिकेची तिजोरी भरणं, म्हणजे निव्वळ मूर्खपणाच आहे.

Web Title - vadapav in toilet?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com