वाधवान बंधूंना VIP ट्रीटमेंट देण्यावरुन राजकारण तापलं, पाहा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

सत्ताधारी आणि विरोधकांनी सुद्धा याप्रकरणानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत.

मुंबई - वाधवान बंधूंना VIP ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलाय. दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे संस्थापक. वाधवान बंधूंना खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी अमिताभ गुप्ता
यांनी मदत केली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अमिताभ गुप्ता यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून वाधवान बंधूना महाबळेश्वरला जाण्यासाठी साह्य केल्याचे समोर आल्यानंतर सरकारने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली आहे. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी रात्री उशिरा चर्चा केली. त्यानंतर गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर वाधवान कुटुंबियावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तर सत्ताधारी आणि विरोधकांनी सुद्धा याप्रकरणानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत.
 

एकीकडे महाराष्ट्र कोरोनासोबत दोन हात करताना पाहायला मिळतोय. तर दुरीकडे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. याला कारण आहे राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांनी दिलेलं एक पत्र.

कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना महाराष्ट्र राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांचं एक पत्र घेऊन वाधवान कुटुंबातील २३ जण मुंबईहून महाबळेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर सरकारवर विशेषत: गृह मंत्रालयावर आणि अनिल देशमुखांवर टीका केली जातेय.

याप्रकरणी काल मध्यरात्रीच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत, अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली होती. आज सकाळी अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर देखील पाठवण्यात आल्याचं गृहमंत्र्यांकडून सांगण्यात आलं.

दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून या प्रकरणी अमिताभ गुप्ता यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात येत होती. अशात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका करत त्यांना उपद्रवी असं संबोधलंय. 

काय म्हणालेत अनिल देशमुख ?  

  • वाधवान केसमध्ये राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना  सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय 
  • अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश ऍडिशनल चीफ सेक्रेटरी मनोज सवनिक यांना दिले गेलेत 
  • वाधवान यांच्यावर IPC 188, 269, 270, 34 आणि त्याचसोबत डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट सेक्शन 51 (B) याचसोबत कोविड १९ च्या सेक्शन 11 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. 
  • सर्वांना माहित आहे, भाजपचे किरीट सोमय्या हे उपद्रवी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत. कोणत्याही IPS अधिकाऱ्याच्या बडतर्फीची अधिकार केंद्राला असतात. 
  • त्यामुळे किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी 

संबंधित बातम्या

Saam TV Live